Advertisement

'मेटा'च्या 'थ्रेड्स'वर लाखोंच्या उड्या

प्रजापत्र | Friday, 07/07/2023
बातमी शेअर करा

मार्क झु्केरबर्ग यांनी 'थ्रेड्स' हे नवीन अ‍ॅप लाँच केलयं. पहिल्याच दिवशी अवघ्या 12 तासांत तीन कोटी लोकांनी या अ‍ॅपवर नोंदणी केल्याची माहिती समोर येत आहे. ट्विटरसारखीच मांडणी असलेल्या ‘थ्रेड्स’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात एका पोस्टसाठी 500 शब्दांची मर्यादा असणार आहे. ही शब्दमर्यादा ट्विटरवरील मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. त्यासोबतच एका पोस्टमध्ये संकेतस्थळांच्या ‘लिंक’, फोटो आणि पाच मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ जोडण्याची मुभा वापरकर्त्यांला असेल. जगभरातील 100 देशांत हे अ‍ॅप सुरू झाले आहे. मात्र, सध्या हे अ‍ॅप युरोपीय देशांत सुरू करण्यात आलेले नाही मासिक शुल्क आकारणी तसेच पोस्टच्या संख्येवरील मर्यादा अशा निर्णयांमुळे ट्विटरची लोकप्रियता घटत चालली आहे. जाहिरातदारांनीही त्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीचा थ्रेड्सला फायदा होईल, असे जाणकारांचे मत आहे

Advertisement

Advertisement