नवी दिल्ली - राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, शरद पवारांची लोकशाही पद्धतीनं निवड करण्यात आली आहे. तसेच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तसेच कोहली या तीन खासदारांसह ९ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ८ ठरावांना मान्यता देण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकारिणीनं शरद पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि केरळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष पीसी चाको यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएत सामिल झालेल्या महाराष्ट्रातील ९ आमदारांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, "आजची बैठक आमचं मनोधैर्य उंचावणारी होती. मीच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. मी सध्या कार्यरत आहे जरी माझं वय ८२ असेल किंवा ९२ असेल. यापुढं आमचं जे काही म्हणणं असेल ते आम्ही निवडणूक आयोगापुढं मांडणार आहोत"