प्रविण पोकळेआष्टी दि.१४-तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथे नरभक्षक बिबट्याने शालन शहाजी भोसले (वय-५५) या महिलेवर हल्ला केल्याने त्यांच्या गळ्याला मोठी दुखापत झाली होती.यावेळी त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १४ दिवसांच्या उपचारानंतर त्या आपल्या घरी परतल्या असून बिबट्याच्या हल्ल्यातून त्यांचा जीव वाचला मात्र आयुष्याभरासाठी आवाज गमावून बसल्या आहेत.बिबट्याच्या तीक्ष्ण दाताने मानेला खोलवर इजा झाल्याने स्वर् नलिकेला इजा झाल्याने त्यांचा आवाज बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.भोसले कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून समाजातील दानशूरांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
शालन भोसले यांच्या घरामधील कर्ता माणूस दोन वर्षापासून अर्धांग वायूच्या आजारामुळे एकाच ठिकाणी पडून आहे.मुलगा पुणे येथे मोलमजुरी करतोय,शेती जेमतेम एक एकर यामधून जीवन जगायचे कसं? दवा पाणी कसा करायचा ?असे अनेक प्रश्न या पीडित कुटुंबाच्या समोर उभे राहिले आहेत.२९ नोव्हेंबर रोजी जोगेश्वरी पारगाव येथील रहिवासी असलेल्या शालन भोसले आपल्या घराच्या पाठीमागील शेतामध्ये शेतातील कामानिमित्त गेल्या असता त्यांच्याच भावकीतील शारदा सयाजी भोसले,स्वाती विजय भोसले,नातु राहुल विजय भोसले,पुतण्या विजय सयाजी भोसले हे सर्वजण थोड्या थोड्या अंतराने शेतामध्ये काम करत होते .सकाळचे साडे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने वयोवृद्ध असलेल्या शालन भोसले यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने आपल्या जबड्याने शालन यांना घट्ट धरून फरपटत नेत असल्याचे व मानेला जोरदार हे पाहून जवळ असलेल्या पुतण्या विजय सयाजी भोसले याने आपल्या काकीवर होत असलेला हल्ला पाहून न डगमगता आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी त्याच्यामागे धावत जाऊन पाय धरून बिबट्याच्या तोंडातून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याने या दोघांनाही जवळपास चाळीस-पन्नास फूट फरफटत ओढत नेले .ही घटना घडत असताना उपस्थित बाकीचे लोक भीतीने मोठ्याने ओरडत होते.या झटापटी मध्ये बिबट्याने शालन यांना सोडून विजय वर हल्ला केला या हल्ल्यात विजय वाचला. सर्वांनी एकत्रित येऊन बिबट्याच्या दिशेने दगडफेक केली.यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला.
या बिबट्याच्या हल्ल्यात शालन यांच्या मानेभोवती मोठ्या जखमा झाल्या बिबट्याचे तीक्ष्ण दातामुळे त्यांच्या गळ्याला खोलवर इजा झाली .अशाच परिस्थितीमध्ये मोठ्या धैर्याने विजय भोसले यांनी शालन यांना उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले. मात्र जखम गंभीर असल्याने त्यांच्यावर नगरमध्ये उपचार करण्यात आले.१४ दिवसांच्या उपचारानंतर त्या घरी परतल्या असून त्यांचा आवाज या हल्ल्यामुळे गायब झाला आहे.भोसले कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.
बिबट्याच्या धास्तीने चार जणांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यु
घटनेनंतरच्या दरम्यान पाच ते सहा दिवसात पारगाव जोगेश्वरी येथील नागरिकांनी धास्तीने चार जणांना हृदयविकारने दुर्देवी मृत्यु झालेत.भयभीत झालेल्या नागरिकांना आ.सुरेश धस यांनी पुढाकाराने गावात आरोग्य शिबीर लावून २०० नागरिकांची आरोग्य तपासण्या केल्या.
हेही वाचा