Advertisement

धुळे सोलापूर राज्य महामार्गावर मांजरसुंबा नाजिक "भगदाड"

प्रजापत्र | Tuesday, 04/07/2023
बातमी शेअर करा

 

नेकनुर - बीड तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ धुळे ते सोलापूर या महामार्गावर मांजरसुंभा येथील बीडकडे जाणा - या उड्डाणपूल संपतो त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डा पडला आहे . हा खड्डा नव्हे तर रस्त्यावर भलमोठ भगदाडच पडल्याच दिसून येत आहे . रात्री अपरात्री वाहनधारकाच्या लक्षात न आल्यास मोठ्या अपघाताची शक्यता आहे . संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करून खड्डा बुजविण्यात यावा अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड , यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी , महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे यांना केली आहे .

या राज्य महामार्गावर अपघातास अतिवेगाबरोबरच रस्त्याची दुरवस्था कारणीभूत ठरत आहे . अपघात होण्यास अतिवेग हे जरी मोठ्या प्रमाणात कारण असले तरी वाहनधारकांचा निष्काळजीपणा , ओव्हरटेक करणे , चुकीच्या दिशेने प्रवेश अथवा वाहन चालवणे दिशादर्शक फलक नसणे त्याच बरोबर निकृष्ट दर्जाचे रस्ते जागोजागी रखडलेले अपुर्ण रस्ते व खड्डे पडणे हे सुद्धा अपघाताचे प्रमुख बनले आहे . रविवार रात्री भाविकांच्या पिकअपला दिशादर्शक फलक नसल्याने अचानक वळण्याने अपघात घडला . या ठिकाणी वारंवार अपघात घडले असले तरी रस्ता कंपनीकडून सुधारणा केली जात नसल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.

 

अपघात वाढले 
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे . शासकीय नोंदीनुसार जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान १२० दिवसात १२ ९ अपघात आणि १३ ९ जणांचा मृत्यू झाला आहे . शिवाय ९ ८ अपघातात १३० जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे .

Advertisement

Advertisement