Advertisement

आजचा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही

प्रजापत्र | Sunday, 02/07/2023
बातमी शेअर करा

पुणे-राज्यातील राजकारणात आज मोठा भूकंप झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.पत्रकार परिषदमध्ये पवार म्हणाले,मोदी म्हणतात राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष आहे पण आज त्याच आमदारांना त्यांच्या पक्षाने मंत्री केले आहे.मी पक्षाची ६ तारखेला बैठक बोलवली होती.मात्र काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली.किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली हे आता लवकरच समोर येईल असेही ते म्हणाले. आजचा घडलेला प्रकार माझ्यासाठी नवीन नाही.१९८० ला ५८ पैकी ५२ आमदार सोडून गेले होतेच, आणि उरलेल्या ६ लोकांना सोबत घेऊन पुन्हा ६९ आमदार निवडून आणले होतेच. आता तशीच परिस्थती निर्माण झाली आहे.मात्र जनतेच्या बळावर मी सांगतो १९८० ची पुनरावृत्ती पुन्हा आगामी निवडणुकीत होणार असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.उद्यापासून राज्यभरात मी स्वतः फिरणार असून जाहीर सभा घेण्याची घोषणाही त्यांनी केली. माझा तरुणांवर विश्वास आहे,आगामी निवडणुकीत जनता कोणाबरोबर आहे हे ही दिसून येईल असे पवार यावेळी म्हणाले. 

 

पक्ष आणि चिन्हावर केलं भाष्य... 
पक्ष आणि चिन्हावर जरी अजित पवारांनी दावा केला असला तरी पक्षाचा अध्यक्ष मी आहे.सहकाऱ्यांची मी निवड केली त्यांना नियुक्ती दिली त्यामुळे पक्ष माझा आहे.आम्ही उद्यापासून लोकांमध्ये जाऊ आणि पूर्ण ताकदीने काम करू. पक्ष आमचा असल्याचे पवार म्हणाले. तटकरे,पटेल यांनी आपली जबाबदारी पार पडली नसल्याचे पवार म्हणाले. 

 

अनेकांची भूमिका वेगळी
आज जे नाराजीनाट्य घडले त्याबाबत दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. अनेक आमदार परत येतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.अनेकांना आजच्या प्रकाराबद्दल माहिती नव्हती त्यामुळे ते सोबत गेले दोन दिवसात सर्वांची भूमिका स्पष्ट होईल असेही पवार म्हणाले.   

 

घर फुटलं नाही.. 
आजचा घडलेल्या प्रकाराबाबत बोलताना शरद पवार यांनी घर फुटलं असं आताच म्हणता येणार नसल्याचे जाहीर केले.नरेंद्र मोदी यांनी हे सर्व घडून आणल्याचे ते म्हणाले. 

 

आम्ही न्यायालयात नव्हे जनतेत जावू 
पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत भाष्य करताना शरद पवार यांनी आम्ही याप्रकरणात न्यायालयात जाणार नाही.आम्ही जनतेच्या दारात जाऊ आणि आमची ताकद दाखवू असा इशारा दिला. 

 

Advertisement

Advertisement