मुंबई-राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले.अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी ही मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्षावर दावा केला आहे.यावेळी आगामी निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखाली लढविणार असल्याचे पवार म्हणाले. राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात जाण्याबाबत आपण इच्छुक असल्याचेही ते म्हणाले.आम्ही जर सेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का जाऊ शकत नाही असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थिती केला.राष्ट्रवादीचे सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.शेतकरी,सामान्यांना न्याय देण्यासाठी आम्ही या सरकारमध्ये सामील झाल्याचे ते म्हणाले.स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर सर्व निवडणुक ताकदीने लढविण्यार असल्याचे पवार म्हणाले.
बातमी शेअर करा