बीड दि.30 - मागच्या पाच वर्षांपासून बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाडयात सर्वाधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश मिळवून देणारी मार्गदर्शन केंद्र म्हणून हायटेकने नावलौकीक मिळविला आहे. राज्यात परराज्यात आणि विदेशातही विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश हायटेकच्या माध्यमातून सुकखर झाले असून आज बीडमध्ये ज्या विद्यार्थ्यांची परदेशात डॉक्टर होण्याची संधी हुकलेली आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे.(दि.1) सकाळी 10 ते 5 या वेळेत हॉटेल विशाल इंटरनॅशनल येथे सेमीनारचे आयोजन करण्यात आले आहे, याचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सुनिल राऊत आणि अनिल राऊत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतात 22 लाख विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेला बसतात. परंतु, केवळ 50 ते 55 हजार इतक्याच जागा उपलब्ध असतात. नीट परीक्षेत चांगले गुण असतानाही स्पर्धेमुळे अनेक विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळत नाही. खासगीमध्ये फी परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांनी सर्व काही संपले असे न मानता, त्यांनी परदेशी विद्यापीठांत वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर होण्याचा पर्याय आहे. त्यासाठी बीडमध्ये हायटेकच्या माध्यमातून सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारला डॉ.विठ्ठल जाधव, डॉ.शैलेश कांचन, डॉ.श्रेयस जुवेकर, डॉ.महेबुब शेख, डॉ.अमय नारकर, डॉ.प्रविण डोरखे यांचे मार्गदर्शन राहणार आहे. या सेमिनारला उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी आपले वैद्यकीय प्रवेशाचे स्वप्न पुर्ण करावे असे आवाहन अनिल आणि सुनिल राऊत यांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत चालणार्या या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळालेली असून याचा अधिक अधिक संख्येने लाभ घेण्याचे आवाहन हायटेक परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.