Advertisement

विरोधकांची दुसरी बैठक शिमल्यात नव्हे 'या' ठिकाणी होणार

प्रजापत्र | Thursday, 29/06/2023
बातमी शेअर करा

मुंबई - केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. यासाठी विरोधकांची पहिली बैठक बिहारच्या पाटण्यात पार पडली.

 

या बैठकीनंतर दुसरी बैठक हिमाचलच्या शिमल्यात होईल असं काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी सांगितलं होतं. पण आता या दुसऱ्या बैठकीचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. हे नवं ठिकाण काय असेल याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सांगितलं आहे. 

 

पत्रकार परिषदेत नेहमीप्रमाणं शरद पवारांनी देशभरातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी विरोधकांच्या पुढील बैठकीबाबत माहिती दिली. शरद पवार म्हणाले, "मध्यंतरी पाटण्याला देशातील १६ राजकीय पक्षांच्या प्रमुखांची बैठक झाली. ही बैठक झाली तेव्हा पंतप्रधान अमेरिकेत होते. नंतर त्यांना या बैठकीची माहिती समजल्यानंतर त्यांच्यात अस्वस्थता वाढलेली दिसली. त्यामुळं व्यक्तीगत हल्ले करायला त्यांनी सुरुवात केली. कारण त्यांनी सांगितलं की ही बैठक म्हणजे एक फोटोजेनिक सेशन होतं" 

दुसरी बैठक कुठे? कधी? अजेंडा काय असेल?
पाटण्यातील बैठकीनंतर आता पुढची बैठक करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही बैठक १३ आणि १४ जुलैला बंगळुरु या ठिकाणी होणार आहे. शिमल्याला होणार होती पण त्या ठिकाणी सध्या अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळं जागा बदलाचा निर्णय आजचं घेतला. त्यानुसार आता दुसरी बैठक बंगळुरुला १३ जुलैला सुरु होईल आणि १४ तारखेपर्यंत चालेल. 

 

बैठकीचा अजेंडा काय असेल?
या बैठकीत पुढची नीती, निवडणुकीला सामोरं कसं जायचं? आणि सत्तेचा गैरवापर करुन राज्याराज्यात जे जातीय चित्र तयार केलं जात आहे, त्याला सामोरं कसं जायचं. तसेच अन्य काही सूचना त्या ठिकाणी येतील त्याचा विचार आम्ही एकत्र बसून करुन आणि पुढचा कार्यक्रम ठरवण्याचा प्रयत्न करु, अशी सविस्तर माहिती शरद पवारांनी दिली.

Advertisement

Advertisement