Advertisement

''समान नागरी कायद्याबाबत माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट करेन, परंतु त्यापूर्वी मोदींनी...''

प्रजापत्र | Thursday, 29/06/2023
बातमी शेअर करा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन समान नागरी कायद्याबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यामध्ये बेपत्ता झालेल्या मुलींची धक्कादायक आकडेवारी सादर केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समान नागरी कायद्याबाबतची भूमिका विषद केली.

 

शरद पवार बोलतांना म्हणाले की, महिला आणि मुलींवर हल्ले, या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूर या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये मुली आणि महिलांवर हल्ले वाढले आहेत. २३ जानेवारी ते २३ मे या कालावमधीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली बेपत्ता झालेल्या आहेत. पुण्यातून ९२३ मुली बेपत्ता आहेत. ठाण्यातून ७२१ बेपत्ता, मुंबई ७३८, सोलापूरमधून, अशा मिळून २४५८ मुली बेपत्ता झालेल्या आहेत. 1४ जिल्ह्यात ४ हजार ४३१ मुली बेपत्ता झालेल्या आहेत.

समान नागरी कायद्याबाबत शरद पवार म्हणाले की, पंतप्रधानांनी समान नागरी कायद्याबद्दल भाष्य केलं. एका देशात दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात, असं ते म्हणाले. परंतु शिख, जैन समाजाविषयी केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी.

 

 

शिख समाजाची समान नागरी कायद्याला समर्थन देण्याची मानसिकता नाही, अशी माहिती माझ्याकडे आहे. विधी आयोगाच्या सूचना आलेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पंतप्रधानांनी याबाबत स्पष्टता द्यावी. त्यानंतर माझा पक्ष यासंदर्भात भूमिका घेईल.

पवार पुढे म्हणाले, देशातलं चित्र बघितल्यानतंर लोकांच्या मनात सध्याच्या राज्यकर्त्यांच्याविषयी असलेली नाराजी आणि अस्वस्थता, याला बगल देण्याचं काम सुरु आहे. शिवाय लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारकडून पावलं उचलली जात असल्याचं पवार म्हणाले. देशातल्या बहुसंख्य राज्यांमध्ये मोदींची सत्ता नाही. त्यामुळे वेगळे मुद्दे उपस्थित केले जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

 

Advertisement

Advertisement