Advertisement

कोट्यावधीचा निधी येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये महिला सफाई कामगारांना वेतनासाठी उपोषण करण्याची वेळ

प्रजापत्र | Monday, 26/06/2023
बातमी शेअर करा

 

अशोक शिंदे 

नेकनुर - बीड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या नेकनूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक , प्रशासकाचा कारभार वरचेवर चव्हाट्यावर येत आहे, पंधरावा वित्त आयोगात येणारा कोट्यावधी निधी , जिल्ह्यांतील सर्वात मोठा आठवडी बाजार यातील वसुली या सह अनेक गाळे, यांची होणारी वसुली मोठया प्रमाणात असतानाही गावात विकास कामे तर सोडा मुलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीत, इतकेच नव्हे ग्रामपंचायत मधील काम करणाऱ्या सफाई कामगारांना वेतनासाठी आंदोलनाला बसावे लागते इतकी दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली आहे.

 

 

  गावात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आ वासून उभी आहे,घाणीचे ढिगारे महिना महिना उचलले जात नाहीत, पथ दिवे बंद आहेत , इतकेच नव्हे तर सफाई कामगारांना वेतनासाठी उपोषण करण्याची वेळ येत आहे असे असताना यावर खर्च न करता नेकनूर ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने , प्रशासकाने ग्रामपंचायत एसीमय केली,नव्या खुर्च्या घेतल्या,लोकांना खुश करण्यासाठी काही भागात सिमेंटचे बाकडे टाकले . पंधरावा वित्त आयोगातून झालेला खर्च तो ही नको तिथे थक्क करणारा आहे. या गोष्टीकडे आता वरिष्ठांनी लक्ष घालुन करवाई करण्याची मागणी नागरिकामधून केली जात आहे.

Advertisement

Advertisement