Advertisement

देशाचा पोषणकर्ता करणार उद्या उपोषण

प्रजापत्र | Sunday, 13/12/2020
बातमी शेअर करा

दिल्ली : कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांनी शनिवारी आंदोलन तीव्र केले. पंजाब, हरियाणा, राजस्थान व यूपीतील टोल नाके शेतकऱ्यांनी टाेलमुक्त केले. दिल्ली-जयपूर हायवे बंद करण्याची योजना रविवारपर्यंत टाळली. आपण सरकारसोबत चर्चेस तयार आहोत, मात्र त्यांनी आधी तिन्ही कायदे मागे घ्यावेत, असे शेतकरी नेते म्हणाले.
                    १४ डिसेंबरला शेतकरी देशभरात जिल्हा मुख्यालयांत धरणे आंदोलन करतील. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शेतकरी उपोषण करणार असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली. एनडीएचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली. दरम्यान, दिल्लीकडे हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांचा ओघ सुरूच आहे.

सरकारमध्ये बैठकांचे सत्र :
 गृहमंत्री अमित शहा व कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी शनिवारी बैठका घेतल्या. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटालांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कृषिमंत्री तोमर व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. चौटाला म्हणाले, पुढील २८ ते ४० तासांत सातव्या टप्प्यातील चर्चा होऊ शकते. ४० तासांत तोडगाही निघू शकतो. तोमर यांनी संध्याकाळी कृषी भवनात हरियाणाच्या काही शेतकरी संघटनांसोबत चर्चाही केली

 

Advertisement

Advertisement