Advertisement

'यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही'

प्रजापत्र | Thursday, 22/06/2023
बातमी शेअर करा

औरंगाबाद - 'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण भक्तिमय झाले आहे. अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईदसुद्धा एकाच दिवशी साजरी केली जाणार आहे. मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देण्याचा निर्णय औरंगाबादमधील वाळूज भागातील मुस्लिम बांधवानी घेतला आहे. 

 

 

विठुनामाचा गजर करत दिंड्या पताका घेऊन वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला आहे. येत्या गुरुवारी 29 जून रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

 

 

यंदा आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद येत आहे. त्यामुळे दोन सणांचा अनोखा संगम एकाच दिवशी होत आहे. मात्र बकरी ईदला होत असलेली कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांकडून घेतला जात आहे.

Advertisement

Advertisement