माजलगाव-संचारबंदी असतांना सकाळच्या शुद्ध हवेत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना माजलगावात पोलीस निरीक्षकांनी स्वतः नागरिकांकडून भर रस्त्यावर प्राणायामा करून घेत त्यांना शिक्षा दिली.तसेच पुन्हा नियम मोडल्यावर कारवाई करण्यात येईल अशी तंबीही यावेळी देण्यात आली.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी,आरोग्य सेवक जीवाचे रान करून दिवसरात्र सेवा देत आहेत. त्यात बीड जिल्ह्यात सुदैवच एक ही केरोना रुग्ण अद्याप पर्यंत नाही. यासाठी प्रशासनाचे योग्य निर्णयच बीड जिल्हावासियांसाठी दिलासादायक ठरले आहेत.याला काही प्रमाणात नागरिकांचीही साथ मिळत नाही.मात्र काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असून माजलगावात सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला निघालेल्या जवळपास ४० ते ५० नागरिकांना आणि महिलांना शहरातील संभाजी चौक याठिकाणी एकत्रित करत पोलिसांनी त्यांच्याकडून प्राणायाम करून घेत त्यांना व्यायामाची शिक्षा दिले.एक तासात करून घेतलेल्या या व्यायामामुळे नागरिकांच्या अंगातून नुसता घाम निघाला होता.दरम्यान यापुढे नियमाचे पालन करा अशी सक्त ताकीद सुद्धा पोलिसांकडून देण्यात आली.पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी दिलेल्या या शिक्षाची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.
प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Leave a comment