Advertisement

बीडमध्ये रंगणार 'धडाकेबाज बैलगाडा शर्यत'

प्रजापत्र | Sunday, 18/06/2023
बातमी शेअर करा

 

बीड - भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गतवर्षी प्रमाणे शुक्रवारी (दि.३०) सकाळी ९ वाजता बीड शहर परिसरात बीड-अ.नगर हायवे, तळेगाव शिवार, काकडहिरा फाटा येथे हौशी शेतकरी बांधवांसाठी धडाकेबाज बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेतील विजेत्यांवर आकर्षक बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पंकजा मुंडे,अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.यावेळी खा.प्रितम मुंडे,आ.सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार,आ.नमिता मुंदडा यांची उपस्थिती राहणार आहे.राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या वतीने गेल्यावर्षी तळेगाव शिवारात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.

 

 

जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील हौशी बैलगाडा शर्यत स्पर्धकांनी मोठ्या संखेने सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी शेतकरी व बैलगाडा शर्यत रसिकांनी हजारोंच्या संखेने उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिला. परंतु पावसामुळे ही शर्यत अंतिम होऊ शकली नाही. शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी बैलगाडी शर्यतीचे आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारातून केले आहे. पावसामुळे शर्यत अर्धवट राहू नये. यासाठी शर्यतीचे स्थळ बदलले आहे. पावसामुळे मैदानावर चिखल होणार नाही. अथवा कोणताही व्यत्यय येणार नाही. यासाठी तळेगाव शिवारातील बीड - नगर हायवे रोड वरील, भोंडवे पेट्रोल पंपासमोरील विशाल मैदानात शर्यतीचे नियोजन केले आहे. शिवाय 30 जून रोजी प्रचंड पाऊस झालाच तर, 1 जून रोजी स्पर्धा पूर्ण करण्यात येईल. या बैलगाडा शर्यतीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धक तथा शेतकरी बांधवांना सहभागी होता यावे. यासाठी स्पर्धकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन, बीड जिल्हा व इतर जिल्हे असे दोन गट तयार करून, स्पर्धा होईल. दोन्ही गटासाठी स्वतंत्र बक्षिसांची व्यवस्था केली जाणार आहे. या होशी बैलगाडा शर्यतीसाठी स्पर्धक व हौशी रसिकांनी प्रतिसाद द्यावा. असे आवाहन राजेंद्र मस्के मित्र मंडळाने केले आहे. स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय बीड येथे अथवा पुढील क्रमांकावर संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी. ९९२१११४९५४ / ९१३०८८७८८८ / ९३५९००५८७९ / ९५२७८१११७७

Advertisement

Advertisement