'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच या सिनेमावर टीका होत आहे. सिनेमातील दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. पण आता 'आदिपुरुष' सिनेमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार आहेत. काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असं मुंतशीर म्हणाले.
बातमी शेअर करा