Advertisement

'...म्हणून सुप्रियाने मला अमिताभ बच्चन म्हटलं'

प्रजापत्र | Saturday, 17/06/2023
बातमी शेअर करा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी बोलतांना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना 'अमिताभ बच्चन' अशी उपाधी दिली होती. याचसंदर्भाने आज अजित पवारांना प्रश्न विचारण्याता आला. यावर अजित पवारांनी नेहमीप्रमाणे खुमासदार शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे.

 

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली होती. यावर सुळे यांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांने मजेदार उत्तर दिले होते. 'अमिताभ बच्चन सर्वच सिनेमात हवे असतात. त्यांच्या आवाज, फोटो, लूक आणि सही सुद्धा चालते. तसेच, अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे चुकीचं काय आहे.' असं सुळे म्हणाल्या होत्या.

 

अजित पवारांचं उत्तर
आज पत्रकारांनी अजित पवारांना सुप्रिया सुळे यांच्या विधानाबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, भावाच्या प्रेमापोटी सुप्रियाने मला अमिताभ बच्चन म्हटलं असेल. माझी बहीण आहे. म्हणाली असेल तर तेवढं मनावर घेऊ नका. राजकारणात काम करत असतांना मी कधीही मी 'एँग्री यंग मॅन'चा तोरा दाखवलेला नाही. हो ला हो आणि नाही ला नाही म्हणायचं, ही आपली कामाची पद्धत आहे, असं अजित पवार म्हणाले.

Advertisement

Advertisement