तुम्हालाही सोन्या चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे आज स्थानिक बाजारात सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे.
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 158 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे 10 ग्रॅमची किंमत 59,799 रुपयांवर गेली आहे. आज चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदीचा दर 73,360 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. कोमॅक्सवर सोने प्रति औंस डॉलर 1975 वर व्यापार करत आहे. चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे. कोमॅक्सवर चांदीची किंमत प्रति औंस डॉलर 24.24 वर व्यापार करत आहे. यापूर्वी, FED बैठकीमुळे डॉलर मजबूत स्थितीत होता. त्यामुळे सोन्या-चांदीच्या भावात घसरण नोंदवण्यात आली.
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
हॉलमार्क (Hallmark)
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
नवा नियम
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.
मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.