Advertisement

इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचे निधन

प्रजापत्र | Monday, 12/06/2023
बातमी शेअर करा

इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी  (Silvio Berlusconi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.बर्लुस्कोनी यांनी  1994 ते 1995, 2001 ते 2006 आणि 2008 ते 2011 या कालावधीत इटलीचे पंतप्रधान होते.सध्या ते अनेक आजारांनी ग्रस्त होते. तसेच ते ल्युकोमियाने ग्रस्त होते.

बर्लुस्कोनी यांनी 1994 ते 1995, 2001 ते 2006 आणि 2008 ते 2011 या  कालावधीत इटलीचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. मात्र, त्यानंतर अनेक वर्षे ते वादात राहिले.  2017 साली सेक्स स्कँडल, भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आणि कर फसवणुकीची शिक्षा असतानाही ते राजकारणात परतले. राजकरणात त्यांचा मोठा दरारा होता.  (Former Italian PM Died)

द गार्डियन रिपोर्टनुसार, तब्येत बिघडल्याने बर्लुस्कोनी यांना काही दिवसांपूर्वी मिलानच्या सैन राफेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा आठवडे ते रुग्णालयात उपचार घेत होते. मायलोमोनोसाइटिक ल्युकेमियावर उपचार घेत होते. त्यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल करण्यात  आले होते. 2020 साली त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची 30 वर्षीय लाईफ पार्टनर मार्ता फासिना आणि दोन मुलांना कोरोना लागण झाली होती.

 

युरोपियन प्यूपल्स पार्टीचे चीफ
इटलीच्या मिलान शहरात 29 सप्टेंबर 1936 साली जन्म झाला. त्यांचे पहिले लग्न 1965 साली कार्ला लूसिय डेल ओग्लियो यांच्याशी झाले. त्यानंतर 1990 साली वेरोनिक लारियो बर्लुस्कोनीशी दुसरा विवाह केला.  2017 साली बर्लुस्कोनी यांना बलात्कराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले होते. ते युरोपियन प्यूपल्स पार्टीचे चीफ होते. तसेच फुटबॉल क्लब ( एसी मिलान) आणि बँकचे मालिक होते. 

 

इटलीच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ओळख
बर्लुस्कोनी यांना इटलीमध्ये मीडिया टायकून देखील म्हटले जाते. त्यांच्यावर लैंगिक घोटाळे, भ्रष्टाचार आणि कर फसवणुकीचे अनेक आरोप होते. बर्लुस्कोनी यांना इटलीच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जात कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनवणे अवघड होते. ते स्वत: शेवटच्या काळापर्यंत खासदार राहिले. 2016 मध्ये त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. ते बरेही झाले होते, पण सप्टेंबर 2020 मध्ये त्यांना कोविड झाला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बरी झाली नाही.

Advertisement

Advertisement