बीड - जिल्ह्यातल्या शालेय पोषण आहार कामगारांनी जिल्हा परिषद कार्यालयावर आज (दि.१२) रोजी भव्य मोर्चा काढला. शासन दरबारी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आपल्या न्याय-हक्कासाठी कामगार आज रस्त्यावर उतरले होते. यात एक ते दीड हजार महिला कामगारांचा सहभाग होता.
1 एप्रिपासून झालेली मानधन वाढ कामगारांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावी, ज्या कामगारांचे वय 65 वर्षे झालेले आहे अशा कामगारांना सेवापुर्ती म्हणून 1 लाख रुपये देऊन त्यांना 3 हजार दरमहा पेन्शन सुरू करण्यात यावी व त्याच कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव शालेय पोषण आहार कामगार म्हणून शाळेमध्ये समावेश करावे यासह इतर मागण्यांसाठी आज कामगारांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी प्रभाकर नागरगोजे, मोहन ओव्हाळ, डॉ. अशोक थोरात, अशोक कातखडे सह आदींचा सहभाग होता.
बातमी शेअर करा