माजलगाव-कोरोनाच्या धर्तीवर मागील महिनाभरापासून केलेल्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूच्या नावावर केवळ किराणा, मेडिकल दुकानेच सुरु आहेत.परंतु याच दुकानातून सर्रास कॉसमेटिक वस्तूंची विक्री करून नियमाचे उल्लंघन करण्यात येते. यामुळे शहरातील जनरलस्टोअर्स दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. एक तर वरील दुकानात होणारी कॉसमेटिक विक्री बंद करावी नसता आम्हाला दुकान सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जनरल स्टोअर्स चालकांनी केली आहे.
कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने सरकारने संपूर्ण देशात महिनाभरापासून लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व व्यवहार, उद्योगधंदे बंद करण्यात आले आहेत. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरु ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला असल्याने महिनाभरापासून किराणा, मेडिकल, भाजीपाला विक्रीस परवानगी आहे. याचा गैरफायदा घेत किराणा, मेडिकल दुकानात महिन्यापासून सर्रास कॉसमेटिक वस्तूंची विक्री करून शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून जनरलस्टोअर्स चालकांवर अन्याय होत आहे. जनरल स्टोअर्स दुकानातील सर्व वस्तू कालबाह्य होत आहेत, इतर दुकानातून वस्तू विक्री होत असल्याने यांचे ग्राहक दुसरीकडे जात असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे प्रशासनाने जनरल स्टोअर्स दुकानदारांवर होणारा अन्याय लक्षात घेता किराणा, मेडिकल दुकानातून होणारी कॉसमेटिक वस्तूंची विक्री बंद करावी, नसता जनरल स्टोअर्स दुकानदारांना दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जनरल स्टोअर्स संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश सोळंके, सचिव सचिन धपाटे, संघ प्रतिनिधी भागवत आबुज, आत्मलिंग खुर्पे, मनीष टवाणी, बालू पिलाजी, संदीप तौर, अनिल फपाळ, विजय उगले, विष्णू पवार आदींनी केली आहे.
प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Leave a comment