Advertisement

एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल 12 जूनला

प्रजापत्र | Friday, 09/06/2023
बातमी शेअर करा

राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (MHT CET 2023)  अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र  पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे.  त्याचप्रमाणे केंद्रीय पद्धतीने प्रवेश फेऱ्यांची सुरुवात निकाल जाहीर झाल्यानंतर होणार आहे. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर होताच जाहीर केले जाणार आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे.  

Advertisement

Advertisement