Advertisement

'तुझा दाभोळकर केला जाईल'

प्रजापत्र | Friday, 09/06/2023
बातमी शेअर करा

राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Sharad Pawar death threat to Maharashtra Politics)शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला दाखल झाल आहे. 'भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल. अशा स्वरूपाची धमकी ट्विटर द्वारे देण्यात आली आहे.  सौरभ पिंपळकर या ट्विटरवर हँडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे.

 

गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष द्यावे

मला व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यामध्येही आक्षेपार्ह मेसेज आहेत. ज्या पद्धतीने धमकी देण्यात आली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या धमकी प्रकरणावर दिली आहे.

Advertisement

Advertisement