Advertisement

बीड आणि हिंगोलीसाठी सैन्य दलाच्या २ कंपन्या मंजूर

प्रजापत्र | Thursday, 08/06/2023
बातमी शेअर करा

बीड दि. ७ (प्रतिनिधी ) एकीकडे शासनाचा वृक्षलागवडीचा उपक्रम केवळ इव्हेन्ट होत असतानाच बीड आणि हिंगोली जिल्ह्यात वन क्षेत्र वाढविण्यासाठी थेट सैन्य दलाची मदत घेण्यात येणार आहे. यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात हा प्रयोग राबविण्यात आला असून आता बीड आणि हिंगोली जिल्ह्यासाठी सैन्य दलाच्या इको बटालियनच्या २ अगतिरिक्त कंपन्या मंजूर झाल्या आहेत.

बीड आणि हिंगोली जिल्ह्यात वनक्षेत्र अत्यल्प असल्याने आता वनक्षेत्र वाढविण्यासाठी सैन्य दलाची मदत घेतली जाणार आहे. सैन्य दलाच्या इको बटालियन मार्फत वनक्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केले जातात. यासाठी विशेष कंपन्या नियुक्त केल्या जातात. तशी कंपनी बीड जिल्ह्यासाठी मिळावी असा प्रस्ताव बीडचे तत्कालीन विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांनी शासनाकडे पाठविला होता. त्याला आता संरक्षण मंत्रालयाची मंजुरी मिळावी आहे. बीड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांसाठी दोन इको बटालियन पुढील पाच वर्षांसाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. आता या कम्पन्यांकडून प्रत्येक वर्षी २०० हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करून घेण्याची जबादारी जिल्हाधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यांनी या कंपन्यांना रोपे आणि इतर गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. इको बटालियनच्या एका कंपनीमध्ये २ वरिष्ठ अधिकारी, ६ कनिष्ठ अधिकारी आणि २१८ सैनिक असणार आहेत.

Advertisement

Advertisement