नेकनूर दि.4 (वार्ताहर)ः नेकनुरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने 18 पेक्षा जास्त नागरिकांना चावल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी आठवडी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होती याच गर्दीत पिसाळलेले कुत्र शिरल्याने तब्बल 18 जणांना चावा घेतला. यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. आठवडी बाजारात शिरलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ पहायला मिळाला.
प्रांजली भांडवलकर (वय 18), भगवान महादेव बांगर (वय 90), ईश्वरी विश्वनाथ शेळवकर (वय 06), स्वरा लोखंडे (वय 04), अजय धनाजी जगताप (वय 32), धनंजय काळे (वय 32), वैष्णवी सुरवसे (वय 13), वैष्णवी चोबे (वय 12), तुळशीराम राऊत (वय 31), शेख शाहेद (वय 32), खालेद (वय 52), आणिजा सय्यद (वय 47), बप्पा मोरे (वय 45), शाम गणगे (वय 42), प्रकाश वेदपाठक (वय 32), आर्यन काळे (वय 06), सदाशिव बांगर (वय 38) यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेला आहे.