Advertisement

कोरड्या शेततळ्यात आढळले तरुणाचे प्रेत

प्रजापत्र | Saturday, 03/06/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारुर दि.3 जून - आडसमध्ये कोरड्या शेततळ्यात तरुणाचे प्रेत आढळले असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे. खबर मिळताच धारुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

 

आडस ता. केज येथील मानेवाडी रस्त्यावर आडसकरांच्या शेतातील कोरड्या शेततळ्यात आज सांयकाळी तरुणाचे प्रेत आढळून आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन पंचनामा केला. सदरील प्रेत विकास शिवाजी भोसले वय 30 या तरुणाचे असून तो कालपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना नातेवाईकांनी दिली. परंतू परिस्थितीनुसार पोलिस सुत्रांकडून सदर तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता असण्याची शक्यता आहे. याबाबत प्रेताचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर माहिती समोर येणार आहे. घटनास्थळी धारुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय आटोळे उपस्थित आहेत.

Advertisement

Advertisement