Advertisement

अमित शहांची भेट घेऊन त्यांना विचारणार .....

प्रजापत्र | Saturday, 03/06/2023
बातमी शेअर करा

परळी दि. ३ (प्रतिनिधी ) : मागच्या काही दिवसांपासून भाजपमधील आपली अस्वस्थता जाहीरपणे मांडणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गोपीनाथ गडावरून पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे. जेव्हा भूमिका घेण्याची वेळ येईल, त्यावेळी आपण ती छातीठोकपणे घेऊ, मात्र मी ज्यांना नेता मानते, त्या अमित शहांना भेटून मी सविस्तर, मनमोकळं बोलणार आहे, 'माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे हे एकदा विचारणार आहे ' असे सांगत त्या भेटीनंतर ठरवू असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. यातून त्यांची राज्यातील नेतृत्वाबद्दलची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे मागच्या काही काळात पक्षात अस्वस्थ आहेत, त्यांनी आपली नाराजी यापूर्वी अनेकदा बोलून देखील दाखविली आहे. त्यातच दोन दिवसापूर्वी 'मी भाजपची आहे, पण भाजप माझा थोडीच आहे ' या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ माजली असतानाच शनिवारी पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरून आपली भूमिका स्पष्ट केली .
'मी काहीही बोलले तरी त्याची चर्चा होते , पण हि चर्चा मी ओढवून आणलेली नाही. २०१९ ला अनेक लोक निवडणूक हरले, त्यातील अनेकांना संधी दिली गेली . किमान दोन डझन आमदार खासदार झाले , मात्र त्यासाठी मी पात्र झाले नसेल कदाचित , मग लोक चर्चा करणारच. माझं नेतृत्व करावं असा राज्यात कोणी नाही, मला अमित  शहांमध्ये माझा नेता सापडला आहे. त्यामुळे मी दिल्लीत जाऊन त्यांच्यासही चर्चा करणार आहे. माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे हे विचारणार आहे. ते  कळल्याशिवाय माझ्या लोकांना काय सांगू हे विचारणार आहे, त्यामुळे त्य्नाच्या भेटीनंतर काय ते पाहू, पण ज्यावेळी भूमिका घेण्याची वेळ येईल तेव्हा छातीठोकपणे घेऊ असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले. यातून त्यांची राज्यातील नेतृत्वाबाबतची खदखद पुन्हा व्यक्त झाली आहे.

 

आम्ही आमचं तोंड शिवून घेऊ शकत नाही
माझं राजकारण केवळ आणि केवळ लोकांसाठी आहे. त्यामुळे कायम लोकांच्या हिताची भूमिका घ्यायची अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे. स्वतः गोपीनाथ मुंडेंनी नामांतर, ओबीसी जनगणना , मराठा आरक्षण यासाठी ज्या भूमिका घेतल्या त्या काही प्रत्येकवेळी पक्षघाच्या भूमिका नव्हत्या,मात्र त्या त्यांना घ्याव्या लागल्या. मी देखील लोकांसाठी बोलते, मग कोणाला काय वाटत याचा विचार मी कशाला करू ? कोणाला काय वाटत म्हणून आम्ही आमची तोंडं शिवून घ्यायची का ? गावात बोर्ड असतो, ग्रामपंचायत सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. ती संतांचेही स्वागत करते आणि दरोडेखोरांचेही , कोण संत , कोण दरोडेखोर हे ज्याचं त्यानं ठरवायचं. म्हणून मी बोलते लोकांसाठी, याचा ज्याचा त्याने काय तो अर्थ घ्यावा असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Advertisement

Advertisement