शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठे बदल केले आहेत. या निर्णयानुसार सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत शुक्रवारी (२ जून) शासन आदेश काढण्यात आला. यात सामान्य प्रशासन विभागापासून साखर आयुक्तांपर्यंत अनेक पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कुणाची कोठे बदली?
१. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली.
“माझी संधी का डावलली गेली?” रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यात सोडून सुनील तटकरे माघारी; म्हणाले, “सरकारी कार्यक्रमात…!”
२. एस. व्ही. आर श्रीनिवास यांची एमएमआरडीएमधून धारावी पुनर्विकास प्रकल्पात नियुक्ती करण्यात आली.
३. बेस्टचे जनरल मॅनेजर लोकेश चंद्र यांची महाडिस्कॉमच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
४. राधिका रस्तोगी यांची विकास आणि नियोजन विभागात नियुक्त करण्यात आली.
५. महिला आणि बालकल्याण विभागातील आय. ए. कुंदन यांची अल्पसंख्याक विकास विभागात नियुक्ती करण्यात आली.
६. संजीव जयस्वाल यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातून म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
७. आशीष शर्मांची मुंबई महानगरपालिकेतून नगर विकास विभागात नियुक्ती करण्यात आली.
८. महाडिस्कॉमच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची बेस्टचे जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
९. खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांची ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
१०. अल्पसंख्याक विभागाचे सचिव अनुप यादव यांची महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
११. तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१२. महाराष्ट्र मेरिटाईमच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची जल जीवन मिशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
१३. नाशिकचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त (पुणे) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१४. उद्योग विभागाचे अतिरिक्त विकास आयुक्त डॉ. माणिक गुरसाल यांची महाराष्ट्र मेरिटाईमच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.
१५. कोल्हापूरचे आयुक्त कादंबरी बलकवडे यांची महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजेंसी, पुणेच्या (MEDA) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
१६. प्रदिपकुमार डांगे यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातून रेशीम विभागाच्या (नागपूर) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
१७. मनरेगाचे (नागपूर) आयुक्त शंतनू गोयल यांची सिडकोच्या (नवी मुंबई) सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१८. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची माहिती तंत्रज्ञान विभागाचे (मुंबई) सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१९. एनआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची पशुसंवर्धन (पुणे) विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
२०. डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (AMC) नियुक्ती करण्यात आली.