चाकण- ता.खेड-बिरदवडी येथील ज्योतिबा एज्युकेशन सोसायटी संचालित बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकालाची उज्वल परंपरा कायम राहिली असून या परीक्षेत विद्यालयाचा निकाल 98.50टक्के लागला आहे. शाळेतून साहिल नवले या विध्यार्थाने प्रथम क्रमांक पटकविला.
गुणवंत विद्यार्थामध्ये नवले साहिल श्रीकांत(84.20%)
द्वितीय क्रमांक - सातपुते दुर्गा कैलास(75.20%)
तृतीय क्रमांक -पडवळ प्रांजली सुरेश(74.20%) व
फडके ओमकार संतोष(74.20%) या विद्यार्थांनी घवघवीत यश मिळविले आहे.दरम्यान उज्वल निकालाची विद्यालयाची परंपरा कायम ठेवल्यामुळे सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे व सर्व पालकांचे संस्थेच्या अध्यक्षा प्रा. देवयानी पवार मॅडम, सचिव श्री.ईशान यशवंत पवार, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील यशस्वी करिअर साठी संस्थेने व विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या अशी माहिती वर्गशिक्षक दादासाहेब ढाकणे यांनी दिली.