Advertisement

तब्बल इतक्या लोकांनी बघितली ipl ची फायनल मॅच

प्रजापत्र | Tuesday, 30/05/2023
बातमी शेअर करा

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) अंतिम सामना सोमवारी रात्री पार पडला. यामध्ये गुजरातला शह देत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना चक्क रात्री दोन वाजेपर्यंत लांबला. मात्र, तरीही तब्बल 3.2 कोटी लोकांनी हा सामना स्ट्रीम करून पाहिल्याचं आकडेवारीमध्ये समोर आलं आहे. यामुळे जिओ सिनेमाने नवीन रेकॉर्ड केला आहे.

 

 

यापूर्वी २४ मे रोजी झालेल्या गुजरात वि. चेन्नई सामन्याला तब्बल 2.5 कोटी लोकांनी जिओ सिनेमा अ‍ॅपवर स्ट्रीम केलं होतं. कोणत्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला एकाच वेळी एवढ्या लोकांनी स्ट्रीम केलं नव्हतं. जिओने ही कामगिरी करून रेकॉर्ड केला होता. त्यानंतर कालच्या फायनलमध्ये जिओने आपलाच रेकॉर्ड ब्रेक (JioCinema Breaks World Record With 3.2 Crore Concurrent Views) केला.

 

 

1,300 कोटी व्ह्यूज
जिओ सिनेमाने एकूण व्ह्यूजच्या बाबतीत देखील मोठा रेकॉर्ड केला आहे. या ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील एकूण व्हिडिओ व्ह्यूजची संख्या 1,300 कोटींच्या वर गेली आहे.

 

 

मोफत दाखवलं IPL
जिओने यावर्षीपासून 2027 पर्यंत आयपीएलचे डिजिटल राईट्स विकत घेतले आहेत. हक्क मिळाल्यानंतर जिओने आपल्या यूजर्सना मोठं गिफ्ट दिलं. यावर्षी आयपीएल मोफत स्ट्रीम करता येईल असं जिओने जाहीर केलं होतं.

 

Advertisement

Advertisement