Advertisement

विद्युत तारेला शॉक लागून दोघांचा जागीच मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 27/05/2023
बातमी शेअर करा

गेवराई - इमारतीचे बांधकाम करणाऱ्या चुलत्या-पुतण्याला विद्युत तारेचा शॉक बसल्याने, या दुर्दैवी घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार ता. 27 रोजी दु. तीन वाजता मन्यारवाडी ता. गेवराई जि. बीड येथे घडली आहे. दरम्यान, पुतण्याला शॉक लागल्याचे दिसताच, त्याला वाचवायला गेलेला चुलत्याचा ही जागीच मृत्यू झाल्याने, हळहळ व्यक्त केली जात असून, सदरील विद्युत तार 33 के.व्ही. ची मुख्य तार असल्याची माहिती आहे. या घटनेत मृत्यू झालेली चुलते- पुतने काबाडकष्ट कष्ट करून उदरनिर्वाह करीत होते.

 

 गेवराई शहरातील संजयनगर येथील रहिवाशी शेख फेरोज इस्माईल व शेख. समीर जुबेद हे दोघे चुलते-पुतणे व्यावसयाने मिस्त्री काम करतात. शनिवार ता. 27 रोजी तालुक्यातील मन्यारवाडी येथील एका बिल्डिंग चे प्लास्टर (बांधकाम) करण्यासाठी गेले होते. बांधकाम करत असतानाच त्यांना विद्युत तारेचा शॉक बसला. आपल्या पुतण्याला ( समीर - वय 27 ) शॉक बसल्याचे दिसताच शेख फेरोज (वय 45 ) यांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत दोघांचा ही जागीच मृत्यू झाला. घटना शनिवार दु. तीन वाजता घडली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून, दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. घटनेची माहिती समजताच गेवराई परिसरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. घटनेत मृत्यू झालेले दोघे चुलते-पुतणे काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करीत होते. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement