Advertisement

'शासन आपल्या दारी' ही योजना नेमकी आहे तरी काय?

प्रजापत्र | Friday, 26/05/2023
बातमी शेअर करा

छ.संभाजी नगर - छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शासन आपल्या दारी' या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार आपल्या दारी' ही योजना सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. का आपण लोकांपर्यंत जावू शकत नाही, असा विचार मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यातून ही योजना साकारली जात आहे. १ लाख ४९ हजार ५७२ लाभार्थी आहेत. ५५१ कोटी रुपयांचं साहित्य शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. यामध्ये सर्व योजनांचा समावेश करण्यात आलेला असल्याचं ते म्हणाले.

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, या सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले. एनडीआरफच्या मदतीमध्ये वाढ केली. गोगलगायींनी केलेल्या नुकसानीला मदतीच्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे या सर्वसामान्यांच्या सरकारवर जनतेचा विश्वास असल्याचं ते म्हणाले. शासन आपल्या दारी ही योजना सर्वसामान्यांच्या दारात सराकरी योजना घेऊन जाण्याचा प्रकल्प असल्याचं शिंदे म्हणाले.

'समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर प्रकल्प आहे. त्यामुळे दळणवळण आणि प्रवास सुखकर आणि कमी वेळेत होणार आहे' असं मुख्यमंत्री म्हणाले. काही वेळातच समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीमध्ये दाखल झालेले आहे. काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील शिर्डीत दाखल होणार आहेत. त्यानंतर समृद्धी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होईल.

Advertisement

Advertisement