Advertisement

डॉ. प्रवीण फड यांची सहाय्यक निबंधक म्हणून निवड

प्रजापत्र | Friday, 26/05/2023
बातमी शेअर करा

बीड दि. २७ (प्रतिनिधी ) : सध्या मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बीड जिल्ह्यातील रहिवाशी डॉ. प्रवीण फड यांची लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक निबंधक म्हणून निवड झाली आहे.

डॉ. प्रवीण फड हे बीड जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचे शिक्षण तलवाडा ता. गेवराई येथे तर वैद्यकीय शिक्षण बीडच्या एसकेएच महाविद्यालयात झालेले आहे. वैद्यकीय शिक्षणांनंतर त्यांनी लोकससेवा आयोगाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला होता. मागील वर्षी त्यांची मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. दरम्यान २०२१ मधील लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात डॉ. प्रवीण फड यांची सहकार विभागातील सहाय्यक निबंधक या राजपत्रित अधिकारी पदावर निवड झाली आहे.

अत्यंत संघर्षातून डॉ. प्रवीण फड यांनी हे यश मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement