बीड दि.25 (प्रतिनिधी):
बीडच्या महसूल प्रशासनाला अधिकार्यांचा दुष्काळ पडणार अशी परिस्थिती आहे कारण मागच्या काही दिवसात जिल्ह्यातून अनेक अधिकार्यांच्या बदल्या होत आहेत मात्र बीड जिल्ह्यात कोणाचीच नियुक्ती करण्यात येत नाही. गुरूवारी औरंगाबाद विभागातील तब्बल 56 नायब तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या. यात बीड जिल्ह्यातील 9 जणांचा समावेश आहे. यातील 6 जण जिल्ह्याबाहेर गेले आहेत मात्र जिल्ह्यात एकाही नायब तहसीलदाराला नियूक्ती देण्यात आलेली नाही.
बीड जिल्ह्यात महसूल विभागात अधिकार्यांचा असणारा दुष्काळ दिवसेंदिवस वाढत आहे. आज घडीला उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांची काही पदे रिक्त आहेत. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातून उपजिल्हाधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या मात्र जिल्ह्यात नव्याने नियूक्ती देण्यात आलेली नाही. आता नायब तहसीलदारांच्या बदल्यामध्येही तिच परिस्थिती आहे. जिल्ह्यातील एकूण 9 नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. यातील तिघांना जिल्हांतर्गत नियूक्ती मिळाली आहे. तर 6 नायब तहसीलदार जिल्ह्याबाहेर गेले आहेत. आता या सहा जणांच्या ठिकाणी कोणाचीच नियूक्ती झालेली नाही. यामुळे महसूल विभागात कामाला गती द्यायची कशी हा प्रश्न असणार आहे.
यांची झाली बदली
श्रीकांत रत्नपारखी(बीडहून मंठा)
प्रशांत जाधवर (गेवराईहून शिरूर कासार)
कमल कुटे(बीडहून पाटोदा)
रामेश्वर स्वामी(धारूरहून रेणापूर)
तुळशीराम आरसूळ(बीडहून निलंगा)
गणेश सरवदे (अंबाजोगाईहून लातूर)
अविनाश निळेकर (माजलगावहून परळी)
बाबुराव रुपनर(परळीहून हिंगोली)
सुनिल ढाकणे (पाटोद्याहून कंधार)