Advertisement

परळीत मृतदेहाची अहवेलना

प्रजापत्र | Thursday, 25/05/2023
बातमी शेअर करा

परळी वै.दि.२५ (प्रतिनिधी)-परळीत एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. परळी शहरातील बरकतनगर रेल्वे क्रॉसिंगवर अवयव तुटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीतून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. 

     परळीतील बरकतनगर रेल्‍वे क्राॅसिंगवर तब्बल ३ तास मृतदेहाचे अवयव हे रेल्वे पटरीवर पडून होते. मात्र उशिराने जाग आल्यानंतरही नगर पालिकेकडून मृतदेहाची अहवेलना करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे परळी शहर अन्‌ परिसरात कुणी आत्महत्या केली अथवा अपघात झाला; तर अशाच स्वरूपात कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह रुग्णालयात नेण्यात येत असल्‍याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.

रेल्‍वे दोन तास थांबली हैदराबाद- औरंगाबाद रेल्वेसमोर आल्याने आज सकाळी साडेसहा वाजेच्‍या सुमारास परळी येथील प्रियदर्शनी बँकेत कॅशिअर म्हणून काम करणारे शिवाजी श्रीपती कुटे (वय ४५, रा. कुटेवाडी ता. बीड) हे जागीच ठार झाले. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या मृतदेह छिन्न विच्छिन्न अन्‌ अवयव तुटलेल्या अवस्थेत रेल्वे पटरीवर पडून होता. यामुळे परळी मिरज रेल्वे दोन तासापासून अधिक उशीर होऊन रेल्वे ्था नकात थांबली.

 

 

 

 

अन्‌ कचरा गाडीत टाकला मृतदेह 

अपघात होऊन देखील रेल्वे पोलिसांनी मृतदेहावर साधा कपडाही टाकला नाही. त्यानंतर सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान नगरपालिकेचे काही कर्मचारी त्या ठिकाणी गेले आणि मृतदेहाचे अवयव गोळा करून त्यांनी एका कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीतून हा मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणला.

Advertisement

Advertisement