Advertisement

केज शहरात चंदन चोरांचा धुमाकूळ

प्रजापत्र | Wednesday, 24/05/2023
बातमी शेअर करा

केज - येथील शासकीय दवाखान्याच्या वाडीवस्तीवर चंदन चोरांचा सुळसुळाट झाला आहे मागील चार दिवासा पुर्वी मधुकर राउत या शेतकऱ्यांचे गोठ्या शेजारील चंदनाची झाडे तोडून नेले आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

केज परिसरातील वाडीवस्तीवर अधूनमधून चंदन चोरीचे प्रकार घडत असतात. ज्या ठिकाणी चंदनाची झाडे आहेत. तेथे चोरट्यांकडून झाडे कापून नेली जातात. गेल्या काही दिवसांपासून या भागात चंदन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. यामागे एखादी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, वनविभागाची यंत्रणा चोरीचा छडा लावण्यात अपयशी ठरली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. चंदनाच्या झाडाला बाजारात चांगली मागणी आहे काल रात्री दुसरी घटना घडली ती चक्क शासकीय विश्रामगृहातील तीन झाडे चंदन चोराने चोरले व दोन झाडे कट करता करता कुणाचीतरी चालूह लागताच अधर्वट सोडून पलायन केले तरी चंदन चोरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केज तालुक्यातीत शेतकरी करत आहेत.

Advertisement

Advertisement