हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. अशातच आता काही तासानंतर हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडेच्या निधनाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, काल रात्री (23 मे ) रोजी अभिनेते नितेश पांडे यांचे वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. लेखक सिद्धार्थ नागर यांनी त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून याबाबत माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, नितेश शूटिंगसाठी इगतपूरला गेले होते. तेथे रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
नितेश पांडे यांचा जन्म 17 जानेवारी 1973 रोजी झाला होता. नितेश पांडे यांनी 1995 पासून टेलिव्हिजनच्या दुनियेत काम करण्यास सुरुवात केली. ‘तेजस’, ‘सया’, ‘मंजिलें अपनी अपनी’, ‘जस्तजू’, ‘हम लड़कियाँ’, ‘सुनैना’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘एक रिश्ता पार्टनरशिप का’, ‘महाराजा की’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘ओम शांती ओम’ चित्रपटात ते शाहरुख खानच्या असिस्टंटच्या भूमिकेत दिसले होता. याशिवाय, ते दिशा परमार आणि नकुल मेहता यांच्या ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार’ मध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय त्यांनी हिंदी टेलिव्हिजनवर अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.