केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात UPSC 2022 परीक्षेचा निकाल (Result) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली असून पहिल्या तीन स्थानांवर इशिता किशोर, गरिमा लोहिया आणि उमा हरथी या मुलींनी स्थान पटकावलं आहे. तर ठाण्यातील कश्मिरा संख्ये ही विद्यार्थिनी देशात 25वी तर राज्यात पहिली आली आहे. यूपीएससीतर्फे 24 एप्रिल ते 18 मे दरम्यान विद्यार्थ्यांचे तीन टप्प्यात इंटरव्ह्यू घेण्यात आले होते. याचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ www.upsc.gov.in यावर पाहाता येणार आहे.
अंतिम परिक्षेत एकूण 933 विद्यार्थी उत्तार्ण झाले आहेत. यात 345 विद्यार्थी खुला गट, 99 ईडब्ल्यूएस, 263 ओबीसी, 154 एसी, 72 विद्यार्थी ST वर्गातील आहेत. 178 विद्यार्थ्यांची आरक्षित सूची तयार करण्यात आली आहे. तर IAS पदासाठी 180 विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
कोण आहे कश्मिरा संख्ये
महाराष्ट्रातही मुलींनी बाजी मारली आहे. ठाण्यात राहाणारी कश्मिरा संख्ये ही देशातून पंचवीसवी तर महाराष्ट्रात पहिली आली आहे. याआधी दोनवेळा तीने प्रयत्न केला होता, पण तिच्या प्रयत्नांना यश आलं नव्हतं आता तिसऱ्या प्रयत्नात कश्मिराने थेट देशातून पंचवीसवा क्रमांक पटकावला आहे. कश्मिराचे आई-बाबा दोघंही नोकरी करतात.
टॉपर्स विद्यार्थ्यांची यादी
1 - इशिता किशोर
2 - गरिमा लोहिया
3 - उमा हरथी एन
4 - स्मृति मिश्रा
5 - मयूर हजारिका
6 - गहना नव्य जेम्स
7 - वसीम अहमद भट
8 - अनिरुद्ध यादव
9 - कनिका गोयल
10 - राहुल श्रीवास्तव
11 - परसंजीत कौर
12 - अभिनव सिवाच
13 - विदुषी सिंह
14 - कृतिका गोयल
15 - स्वाति शर्मा
16 - शिशिर कुमार सिंह
17 - अविनाश कुमार
18 - सिद्धार्थ शुक्ला
19 - लघिमा तिवारी
20 - अनुष्का शर्मा
21 - शिवम यादव
22 - जी वी एस पवनदत्त
23 - वैशाली
24 - संदीप कुमार
25 - सांखे कश्मीरा किशोर
26 - गुंजीता अग्रवाल
27 - यादव सूर्यभान अच्छेलाल
28 - अंकिता पुवार
29 - पौरूष सूद
30 - प्रेक्षा अग्रवाल