Advertisement

प्रसिद्ध अभिनेता आदित्य सिंह राजपूतचं निधन

प्रजापत्र | Monday, 22/05/2023
बातमी शेअर करा

प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल व कास्टिंग दिग्दर्शक आदित्य सिंह राजपूतचं निधन झालं आहे. सोमवारी(२२ मे) दुपारी मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आदित्यच्या मृत्यूने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.

आदित्य अंधेरीतील एका इमारतीत ११व्या मजल्यावर राहत होता. काही मित्रांना घरातील बाथरुममध्ये त्याचा मृतदेह आढळला. आदित्यच्या मित्रांनी वॉचमॅनच्या मदतीने त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह शवविच्छेनसाठी पाठविण्यात आला आहे.

आदित्यने मॉडेलिंगपासून मनोरंजनविश्वातील करिअरला सुरुवात केली होती. त्याने अनेक मालिका व चित्रपटांतही काम केलं आहे. ‘क्रांतिवीर’, ‘मैने गांधी को नही मारा’ या चित्रपटात तो झळकला होता. याशिवाय एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला’ या रिएलिटी शोमध्येही आदित्य सहभागी झाला होता. त्याने ३००हून अधिक जाहिरातीत काम केलं आहे.

‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्येही आदित्यने काम केलं आहे. त्याने पॉप कल्चर हा ब्रँड सुरू केला होता. या ब्रँडद्वारे त्याने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देत कलाकरांना लॉन्च केलं होतं.

Advertisement

Advertisement