Advertisement

लग्नाहून परतणाऱ्या स्कार्पिओला टिप्परची धडक

प्रजापत्र | Sunday, 21/05/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारुर दि.21 मे – terrible accident धारुर तालुक्यातील चिंचपूर येथील कुटूंबीय माजलगावहून लग्न समारंभ उरकून परतत असताना भोगलवाडी फाटा ता. धारुर Dharur येथे माजलगावकडे जाणाऱ्या टिप्परने धडक दिली. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून एका बारा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. terrible accident .. Scorpio returning from marriage hit by tipper; Death of a 12-year-old boy.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर Dharur तालुक्यातील चिंचपूर येथील हंडिबाग कुटूंबीय माजलगाव येथे एका लग्न समारंभाला सहकुटूंब गेले होते. दुपारी लग्न उरकुन परतत असताना तेलगाव कारखान्याजवळ भोगलवाडी फाट्यावर एका टिप्परने टिप्पर (क्र. MH 44 U 9309 ) जोराची धडक दिली. या धडकेत स्कार्पियो मधील दोन महिला जखमी असून या अपघातात अक्षय उर्फ सोनू आशोक हंडिबाग या 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. हंडिबाग कुटूंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातस्थळी दिंद्रुड पोलिस दाखल झाले.

Advertisement

Advertisement