Advertisement

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

प्रजापत्र | Saturday, 20/05/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने समोरून धडक दिल्याने अपघात होऊन दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. ही घटना माजलगाव – गढी रोडवरील केसापूरी कॅम्प परिसरात आज दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केसापुरी येथील विकास रामदास खरात (वय ३२) हा तरुण माजलगाव ते गढी रोडवरून दुचाकीने माजलगावकडे येत होता. या दरम्यान आज (शनिवारी) १ वाजण्याच्या दरम्यान केसापुरी कॅम्प परिसरात दुचाकी (MH 20 GJ2283) जोराची माजलगावकडून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये विकास खरात याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.
अपघातस्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक दाभाडे, पोलीस कर्मचारी श्रीमंत पवार, तोटेवाड यांनी भेट देत, सदरील मृतदेह शव विच्छेदन करिता माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.