Advertisement

IPL चा फटका इंग्लंडला

प्रजापत्र | Tuesday, 16/05/2023
बातमी शेअर करा

आयपीएलमुळे इंग्लंड संघाला मोठा धक्का बसलाय. प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याचे समोर आलेय. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेला मुकलाय. त्याशिवाय तो पुढील काही दिवस क्रिकेटपासून दूर राहणार आहे. जोफ्रा आर्चर याला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर गेला होता. जोफ्रा आर्चर याला पुन्हा एकदा स्ट्रेस फ्रॅक्चरची समस्या भेडसावत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत जोफ्राच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. 

जोफ्रा आर्चरसाठी सध्याची वेळ कठीण आहे.  मोठ्या कालावधीनंतर जोफ्रा आर्चर पुन्हा एकदा पुनरागमनासाठी प्रयत्नशील होता. पण त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पुढील काही दिवस क्रिकेटपासून दूर असेल, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डानेचे मॅनेजिंग डायरेक्टर रॉब यांनी सांगितेलय. जोफ्रा आर्चरच्या पुनरागमानासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. जोफ्रा पुन्हा एकदा इंग्लंडच्या जर्सीत मैदानात उतरेल असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. 

 

मार्च 2021 पासून जोफ्रा कसोटी क्रिकेटपासून दूर - 

जोफ्रा आर्चर मागील दोन वर्षांपासून स्ट्रेस फ्रॅक्चरचा सामना करत आहे. जोफ्रा आर्चरने डिसेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. पण पुन्हा दुखापत झाली. आता आयपीएलमधून तो पुनरागमन करणार होता. पण त्याचा त्रास पुन्हा बळावल्यामुळे आयपीएल अर्ध्यावर सोडावी लागली.  जोफ्रा आर्चर 2021 नंतर इंग्लंडसाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. जोफ्रा आर्चर याला इंग्लंड आणि ससेक्स टीमच्या मेडिकल स्टाफच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आलेय.  यंदा भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी जोफ्रा आर्चर संघात पुनरागमन करेल, अशी इंग्लंडची आशा आहे. 
 

Advertisement

Advertisement