Advertisement

पार्थिव पटेलचा क्रिकेटला रामराम

प्रजापत्र | Wednesday, 09/12/2020
बातमी शेअर करा

 मुंबई :भारतीय संघाचा विकेटकीपर पार्थिव पटेलने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून (कसोटी, वनडे, टी-20) संन्यास घेतला आहे. त्याची क्रिकेटमध्ये 19 वर्षांचे करिअर होते. पार्थिवने 2002 मध्ये 17 वर्षे 153 दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यासह, तो यष्टिरक्षक म्हणून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. पार्थिव हा कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चौथा सर्वात तरुण खेळाडू होता. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर, पीयूष चावला आणि एल शिवरामकृष्णन यांच्या नावावर आहे.
पार्थिवने मानले गांगुलीचे आभार
पार्थिवने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचे आभार मानले. पार्थिवने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, "मी विशेषतः दादाचे आभार मानतो. ते माझे पहिले कर्णधार आहेत. त्यांनी माझ्यावर बराच विश्वास दाखवला."
दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने पत्नी अवनी आणि आई-वडिलांचे आभार मानले. त्याने लिहिले की, "माझ्या या प्रवासात तुम्ही मला साथ दिलीत, त्यासाठी धन्यवाद."

 

हेही वाचा

Advertisement

Advertisement