Advertisement

‘मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश, म्यानमारकडे सरकले

प्रजापत्र | Thursday, 11/05/2023
बातमी शेअर करा

महाराष्ट्रासह ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यात महाराष्ट्राचा काही भाग तसेच बिहार, झारखंड, यूपी, दिल्ली, छत्तीसगड, राजस्थान व गुजरातचा समावेश आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये बुधवारी ४३.९ अंश तापमानाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरात बनलेल्या मोचा चक्रीवादळाने उग्र स्वरूप धारण केले आहे. परंतु त्याने दिशा बदलली असून ते बांगलादेशचा कॉक्स बाजार व म्यानमारच्या दिशेने सरकले.

त्याचा वेगही ताशी ५ किमीने वाढला आहे. गुरुवार-शुक्रवारी वादळाचा झंझावात वाढणार असून ताशी १३० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. या वादळाचा बंगाल, ओडिशा व आंध्र प्रदेशच्या किनारी परिसर वगळता देशाच्या इतर भागात फारसा परिणाम जाणवणार नाही. तथापि, अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

Advertisement

Advertisement