Advertisement

"पक्षादेश माझ्या शिवसेनेचाच चालणार! आता..."

प्रजापत्र | Thursday, 11/05/2023
बातमी शेअर करा

मुंबई - आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे जरी सोपवला असला तरी पक्षादेश हा माझ्या शिवसेनेचाच राहिलं असं म्हटलं आहे. त्यामुळं आता अध्यक्ष महोदयांनी देखील आता यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सत्तेसाठी हापापलेल्यांना चपराक देणारा हा निकाल आहे, असंही यावेळी ठाकरे म्हणाले. (Maharashtra politcal crisis Supreme Court final decision ShivSena case Uddhav Thackeray first comment)

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, हा जो निकालदिला आहे त्यामध्ये एकूणच सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडं-नागडं राजकारण याची कोर्टानं चिरफाड केली आहे. खरं मणजे राज्यपालांची भूमिका अयोग्य होती असं कोर्टानं म्हटलं आहे, त्यामुळं राज्यापाल यंत्रणेचं वस्त्रहरण झालं आहे. हे राज्यात आणि दिल्लीबाबतही घडलं आहे.

अपात्रतेचा निर्णय त्यांनी अध्यक्षांकडे जरी सोपवलेला असला तरी पक्षादेश हा माझ्या शिवसेनेचाच राहिल. आता अध्यक्षांनी देखील यामध्ये वेळ न घालवता यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कायदेशीरदृष्ट्या मी राजीनामा दिला हे चुकीचच असेल पण नैतिकतेच्या दृष्टीनं पाहिलं तर ज्या लोकांना माझ्या पक्षानं विश्वास दाखवला आणि त्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर मी विश्वास का दाखवू?

आज तर राज्यात सरकारच नाही, त्यामुळं जसं मी नैतिकतेचं पालन केलं त्याप्रमाणं सध्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी देखील नैतिकता असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, जसा मी दिला होता, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली.

Advertisement

Advertisement