दिल्ली-महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात मोठा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेची निर्णय स्वतः निर्णय घेण्यास नकार दिला असून विधानसभा अध्यक्षांनीच त्याचा निर्णय घ्यावा आणि तो विहित वेळेत घ्यावा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या अपात्रतेची निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. मात्र त्याचवेळी व्हीप हा सुनील प्रभू यांचाच असल्याने आमदारांच्या अपात्रतेवर कायदेशीर निर्णय देताना नार्वेकर यांना देखील अडचणी येतील
बातमी शेअर करा