Advertisement

माजलगाव धरण परिसरात हातभट्टी चा अड्डा उध्वस्त

प्रजापत्र | Wednesday, 10/05/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - माजलगाव धरण परिसरात फुले पिंपळगाव शिवारात गावठी दारू बनविण्याच्या अड्डावर शहर पोलिसांनी धाड टाकत जवळपास साडेचारशे लिटर दारू पकडली असून ही कारवाई आज (दि.१०) रोजी  शहर पोलिसांनी केली आहे. 

 

माजलगाव शहरासह ग्रामीण भागात गावठी, हातभट्टी दारू अनेक ठिकाणी तयार करून त्याची विक्री केली जाते. या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून कुटुंब उघड्यावर आले आहेत त्यामुळे पोलीस यंत्रणा आक्रमक झाले असून या गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर मागील दहा ते पंधरा दिवसांमध्ये कारवाया करत हे अड्डे उध्वस्त केले आहेत. आज (दि.१०) रोजी फुले पिंपळगाव परिसरात धरण परिसरात दारू वाडा उध्वस्त करत जवळपास ४५ हजार रुपयांची गावठी दारू पोलिसांनी नष्ट केली आहे या कारवाईत शहर पोलीस स्टेशन चे सपोनि निलेश इधाटे हवालदार मोरे पो. कॉ. मिरकले , पो. कॉ. करे यांचा समावेश आहे. पोलीस शिपाई शिवगणेश श्रीराम मिरकले  यांच्या फिर्यादीवरून जगन्नाथ अच्युत जाधव रा. केसापुरी याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल एस. बी. मोरे हे करत आहेत.

Advertisement

Advertisement