Advertisement

परळीत गॅस टाकीचा स्फोट

प्रजापत्र | Tuesday, 09/05/2023
बातमी शेअर करा

परळी - शहरातील बरकत नगर भागात एका घरात अचानक गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन एक ठार चार जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज सायंकाळी घडली. या घटनेत अदिल उस्मान शेख या 14 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असुन शमशाद बी सय्यद हाकीम,शेख आवेस गौस व अन्य दोन जण जख्मी झाले आहेत.

मयत अदिल उस्मान शेख या युवकाला परळी उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून यामधील दोघे जखमेवर उपचार चालू असून इतर दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

बरकत नगर मधील एका घराच्या बाजूला आग लागली होती आग एका बंद असलेल्या रूममध्ये जाऊन तेथील गॅसचा स्फोट झाला स्पोर्ट इतका मोठा होता की बाजूला असलेल्याअदिल उस्मान शेख या 14 वर्षीय युवकाच्या पोटाला मारलागल्याने त्याचा मृत्यू झाला.तर शमशाद बी सय्यद हाकीम,शेख आवेस गौस व अन्य दोन जण जख्मी झाले आहेत. या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मयतास व जखमीस रुग्णालयात उपाचारासाठी भरती केले. 

Advertisement

Advertisement