बीड दि.९ (प्रतिनिधी)श्री गजानन सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडल्या निवडणूक निर्णय अधिकारी गो क परदेशी यांच्या उपस्थितीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची अध्यक्षपदी तर संचालक माधवराव मोराळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे
यावेळी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की,श्री गजानन सहकारी बँक,बीड तालुका दूध संघ आणि श्री गजानन सहकारी सूत गिरणीच्या निवडी बिनविरोध झाल्या,तिन्ही संस्थांच्या सभासदांनी भविष्यातील गरज आणि संस्थेची प्रगती लक्षात घेऊन हा विश्वास टाकला आहे, सूत गिरणी ही संस्था प्रगतीपथावर असून परदेशात सूत निर्यात करून सूतगिरणीचे उत्तम उत्पादन चालू आहे,चीन,बांगलादेश, आणि तुर्की या परदेशातून आपल्या सुताला चांगली मागणी आहे,मागील तीन वर्षात 156.52 कोटीचे सूत स्थानिक मार्केट मध्ये विकले गेले तर चालू आर्थिक वर्षी 50 कंटेनर निर्यात करणार आहोत त्यात 10 कंटेनर रवाना झाले असून आजच पुन्हा एकदा 21 नंबरच्या सुताची 5 कंटेनरची मागणी परदेशातून करण्यात आली आहे ती लवकरच रवाना होणार असून विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत ही सूतगिरणी वाटचाल करत आहे यावेळी नवीन काही संचालक सहभागी झाले आहेत पुढच्या प्रवास सर्वांच्या सहकार्याने सुरळीत चालेल असा विश्वास माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे
श्री गजानन सहकारी सूतगिरणी मर्यादित इट या वर्गातील सुतगिरणीच्या सन 2023 ते 2028 या कालावधीची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली होती दिनांक 27 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जेवढ्या जागा होत्या तेवढेच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे सूतगिरणीची निवडणूक अविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी यांनी केली होती ,या संचालक मंडळात बिनविरोध निवडून आलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माधवराव मोराळे, बालाप्रसाद जाजू, कल्याण खांडे, विश्वंभर सावंत, अरुण बोंगाणे, अंकुश उगले, अच्युत शेळके, कोंडीराम निकम, नसिरुद्दीन शेख, विष्णुदास बियाणी, देविदास मंचुके, धनंजय जगताप, अमोल देशमुख, बाबुराव राठोड, जयदत्त थोटे, चिमाजी वाघमारे, रोहित क्षीरसागर, लक्ष्मण लकडे, श्रीमती सुजाता जाधव, श्रीमती योगिता सुधाकर मिसाळ या 21 संचालकांची निवड घोषित करण्यात आली होती,आज दि 9 मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी व सुनील जाधव यांच्या उपस्थितीत सर्व संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती अध्यक्ष पदासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तर उपाध्यक्ष पदासाठी माधवराव मोराळे यांचे दोनच अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड घोषित करण्यात आली आहे,यावेळी नवनियुक्त संचालक, निवडणूक अधिकारी,सहायक अधिकारी यांचे सूत गिरणीचे कार्यकारी संचालक विश्वनाथ काळे,सतीश कांबळे,शिवाजी जगताप,विनोद गाडे शेख अलीम यांनी सत्कार करून स्वागत केले यावेळी हर्षद क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती