नवी दिल्ली - बनावट आणि स्पॅम कॉल (व्हिडिओ/ऑडिओ दोन्ही) ओळखण्यासाठी व्हाट्सअॅप लवकरच अॅपमध्ये एक नवीन वैशिष्ट्ये जोडणार आहे. यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अॅपने कॉलर ओळख सेवा देण्यासाठी ट्रु कॉलर सोबत भागीदारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे फीचर व्हॉट्सअॅप यूझर्सना इंटरनेटद्वारे येणारे फेक, स्पॅम आणि कॉल्स ओळखण्यात मदत करेल. नवीन फीचर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलसाठी उपलब्ध असेल. सध्या, ट्रू-कॉलरवर केवळ यूझर्सला त्यांच्या टेलिकॉम सेवा प्रदात्यांद्वारे प्राप्त होणारे कॉल ओळखता येतात.
हे फीचर्स मे महिन्याच्या अखेरीस सर्वासांठी आणले जाईल
ट्रू-कॉलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन मामेडी यांनी सांगितले की, हे फीचर सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहे. हे वैशिष्ट्य मे महिन्याच्या अखेरीस जगभरात आणले जाईल. तथापि, या फीचरच्या रोल आउटबाबत त्यांनी कोणतीही पुष्टी किंवा निश्चित तारीख दिलेली नाही.
टेलीमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्सची संख्या वाढतेय
ट्रुकॉलरच्या 2021 च्या अहवालानुसार, भारतासह इतर देशांमध्ये टेलिमार्केटिंग आणि स्पॅम कॉलची संख्या सतत वाढत आहे. येथील मोबाईल युझर्सला दर महिन्याला सरासरी 17 स्पॅम कॉल येतात. या वर्षाच्या सुरुवातीला, दूरसंचार नियामकाने एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियाला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून टेलिमार्केटिंग कॉल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले. ट्रु-कॉलरने सांगितले आहे की, अशी सेवा सुरू करण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटर्सशी चर्चा सुरू आहे.
व्हॉट्सअॅप आणि ट्रुकॉलरसाठी भारत ही मोठी बाजारपेठ
40 कोटीहून अधिक व्हॉट्सअॅप यूझर्सने हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. त्याचवेळी, ट्रुकॉलरसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ट्रुकॉलरचे जगभरात 35 कोटी यूझर्स आहेत. त्यापैकी 25 कोटी यूझर्स भारतात असून ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
गेल्या 2 आठवड्यात व्हॉट्सअॅपवर फेक कॉल्सचे प्रमाण वाढले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 2 आठवड्यात व्हॉट्सअॅपवर फेक कॉल्सची संख्या वाढली आहे. सर्वाधिक बनावट कॉल आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येत आहेत.