पुणे:करोना प्रतिबंधक लशीच्या पुरवठयाचा करार करण्यासंदर्भात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरु आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या या लशीचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट करत आहेत. या लसीचे आतापर्यंत काही कोटी डोस बनून तयार झाले आहेत.भारतात सीरमने या लसीला ‘कोविशिल्ड’ असे नाव दिले आहे. ‘कोविशिल्ड’च्या प्रत्येक डोसची किंमत २५० रुपये असू शकते. लसीच्या किंमतीसंदर्भात सीरम बरोबर सुरु असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असलेल्या सरकारमधील सूत्राने सांगितले.
“लस पुरवठयाच्या कराराची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल” असे सूत्राने सांगितले. ‘कोविशिल्ड’ लसीचे आधीपासूनच चार कोटी डोस बनून तयार असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले होते. महिन्याभरात आणखी १० कोटी डोसच्या उत्पादनाची योजना आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ड लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. यूकेमध्ये या लशीला मान्यता मिळाल्यानंतर भारतातही कोविशिल्डला मान्यता मिळू शकते.
बीड मध्ये ओ बी सी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा
बातमी शेअर करा